अंबाजोगाई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या राष्ट्रसेवेच्या २५ वर्षांच्या समर्पणाचा सन्मान करण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या पुढाकाराने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात २६ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता 'स्वप्नाचा भारत' या विषयावर भव्य चित्रकला, निबंध आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि पारितोषिके
या भव्य स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चौथी ते सातवी आणि सातवी ते दहावी अशा दोन गटांत चित्रकला व निबंध स्पर्धा पार पडतील. तसेच रांगोळी स्पर्धेसाठी चौथी ते दहावी आणि खुला गट असे दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास पंधराशे रुपये, द्वितीय क्रमांकास एक हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास सातशे रुपये देण्यात येतील. याशिवाय दोन स्पर्धकांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिकही दिले जाणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी आवश्यक कागद संयोजकांकडून पुरविला जाईल. स्पर्धा संपल्यानंतर त्याच दिवशी दुपारी चार वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.
संपर्क व आवाहन
जनसहभागातून सेवा, संस्कार आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणाऱ्या या जनसेवेच्या महाकुंभात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आमदार नमिताताई मुंदडा आणि भारतीय जनता पार्टी केज विधानसभेकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी नागरिक गोकुळ नाना कदम (९९६०४०४०२९), संजय गंभीरे (९९२१३५११११), अनंत आरसुडे (७२७६१८९९९९), सत्यप्रेम इंगळे (९०४९९९९७१६), मंदार काटे (९९७०२८५१९१) आणि योगेश कडबणे (७०२०७३०३८०) यांच्याशी संपर्क साधू शकतात.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!