केज: विविध न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल लोहार समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाला केज तालुका सकल लोहार समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. शासनाने या मागण्यांसंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास केज तहसील कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा सकल लोहार समाजाचे तालुका कार्याध्यक्ष विलास आवाड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनाची वेळ
अत्यंत हलाखीच्या व बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लोहार समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिक मागण्यांकडे शासन स्तरावरून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. समाजाच्या हक्कांकडे होणाऱ्या या अनास्थेमुळेच पंढरपूर येथे समाज बांधवांवर अन्नत्याग आंदोलन करण्याची नामुष्की ओढवली आहे. या आंदोलनाला केज तालुक्यातील सकल लोहार समाजाचा सक्रिय व संपूर्ण पाठिंबा असल्याचे निवेदन सोमवारी केजचे तहसीलदार अशोक भंडारे यांना सादर करण्यात आले. शासनाने आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास केजमध्येही तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निवेदनावर सकल लोहार समाजाचे तालुका कार्याध्यक्ष विलास आवाड, तालुकाध्यक्ष अनंतराव अनेराव, दत्तात्रय लोहार, संतोष टिंगरे, ऋषीकेश कळसाईत, बब्रुवान नवघण, सचिन कळसाईत, मुकुंद अंकुशे, बाळासाहेब सूर्यवंशी, राहुल अंकुशे आणि अनिल गाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!