अंबाजोगाई(प्रतिनिधी) - महिला सबलीकरण व सक्षमीकरण महिलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी पुरक असून यातूूच उत्कर्ष व उन्नती होईल असे मत प्रख्यात लेखिका डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले. त्या सोमवार २१ सप्टेंबर रोजी योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जी.बी.व्यास होते. पुढे बोलताना डॉ. किन्हाळकर म्हणाल्या की,सक्षमीकरण व सबलीकरण या दोन्होही गोष्टी अनिवार्य आहेत. पायाभूत सुविधा, संसाधन आणि वातावरण उपलब्ध करून देणे हि सक्षमीकरणाची पहिली पायरी आहे.

अर्थिक,शैक्षणिक, राजकीय व कायदेशीर सबलीकरणासाठी रोजगाराच्या संधी समान वेतन मोफत शिक्षण ५०% राजकीय आरक्षण, शिष्यवृत्ती व हुंडाबंदी कायदा या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावाच लागेल. याच गोष्टी स्वयं निर्णय क्षमता, मानसिक सक्षमीकरण व नेतृत्व गुण वाढीसाठी प्रेरणादायी आहे. समाजात व जनमाणसात महिलांचा सन्मान व दर्जा उंचावेल असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. एम.व्ही.कानेटकर यांनी केले.

पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.वृंदा कुलकर्णी, सूत्रसंचालन करून प्रगती घोडके यांनी आभार मानले. यावेळी यो.शि. संस्थेचे पदाधिकारी, संचालक,इतर मान्यवर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.