अंबाजोगाई: घाटनांदूर येथे एका ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. राजाभाऊ जोगदंड असे या तरुणाचे नाव असून, या अकाली मृत्यूमुळे घाटनांदूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राजाभाऊ यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घराच्या आडूचा आश्रय घेत हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून दुःख व्यक्त केले जात आहे.

राजाभाऊ यांनी आत्महत्या का केली, यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची नोंद घेत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या पुढील तपासानंतरच या घटनेमागील सत्य परिस्थिती समोर येऊ शकेल.