अंबाजोगाई तालुक्यातील सेलू आंबा गावाजवळ भरधाव ट्रकने स्विफ्ट डिझायर कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून, कारचालक रामेश्वर जाधव हे जखमी झाले आहेत.
रामेश्वर बाबुराव जाधव (रा. रेणुका वसाहत, अंबाजोगाई) हे २ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२० वाजेच्या सुमारास सेलू आंबा रोडवरून आपली कार (एमएच १४ एजे १५५८) चालवत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकच्या (एमएच ४० बीजी ०६८३) चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत कारला जोराची धडक दिली. या धडकेत कारची डिकी आणि मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. रामेश्वर यांच्या डोक्याला आणि पायाच्या घोट्याजवळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल घोळवे पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!