अंबाजोगाई -: शेकडो किलोमीटर अंतर पार करत भर दिवाळीच्या सणातही ऊसतोडीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांना आधार माणुसकीचा यांच्या वतीने उसाच्या फडात जाऊन फराळाचे वाटप करण्यात आले. अंबाजोगाई व परिसरातील ९० ऊसतोड कामगारांच्या परिवारा सोबत ॲड.संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाऊबीज साजरी केली.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा, देवळा, सारसा या गावात छत्तीसगड, नांदेड जिल्ह्यातील मुखेड, व अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांडा येथील ऊसतोड कामगार ऊस तोडणीचे काम करत आहेत. शेकडो किलोमीटर अंतराहून आलेले हे ऊसतोड कामगार ऐन दिवाळीतही ऊसतोड करत होते. आधार माणुसकीचे अध्यक्ष ॲड.संतोष पवार,
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना संचालक राजेभाऊ पवार, ह भ प नानाजी पवार, राजेंद्र देवरवाडे, प्रशांत बर्दापूरकर, अनंत निकते यांच्यासह उपस्थित ग्रामस्थानी या ऊसतोड कामगारांसोबत आपली भाऊबीज साजरी केली.
या सर्व कुटुंबांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. व ऊसतोड कामगारांची दिवाळी त्यांच्या पालावर जाऊन साजरी केली.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!