अंबाजोगाई (प्रतिनिधी) - योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक, अंबाजोगाई येथे विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी फ्युचर ट्रेड इन मॅकॉनिकल इंजिनिअरींग या विषयावर विशेष सेमिनार संपन्न झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून.मीनाक्षी कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मॅकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील बदलते स्वरूप,भविष्यातील तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील अपेक्षा, आवश्यक कौशल्ये आणि करिअर डेव्हलपमेंट याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रमण देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.शाम गडदे,आभार ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. बप्पासाहेब सोनवणे यांनी मानले.यावेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, संचालक,प्रताप पवार,संचालिका ऍड. कल्याणी विर्धे, प्रा.एन.के. गोळेगावकर,रमण सोनवळकर, उद्योजक अमोद कुलकर्णी, डॉ.वैशाली कुलकर्णी, डॉ.जान्हवी कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!