बीड: स्व.संतोष देशमूख हत्या प्रकरणात कारागृहात बंदस्ति असलेल्या आरोपीकडून स्व.विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणे यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी, तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी एक पूर्वनियोजित कट रचला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खा.बजरंग सोनवणे यांनी जल्हिा पोलीस अधीक्षकांना सवस्तिर पत्र देत कारागृह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह संबंधित कटकारस्थानांमागील प्रमुख सूत्रधारांवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पत्रात म्हटले आहे, स्व.संतोष देशमूख हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेले आरोपी वाल्मीक कराड आणि सराईत गुन्हेगार सुग्रीव कराड यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ रेकॉर्डिंग नुकतीच उघडकीस आली आहे. या ऑडिओ क्लिपवरून हे स्पष्ट नष्पिन्न होते की, सौरभ सोनवणे यांचा या हत्येशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नसतानाही, त्यांना या गंभीर गुन्ह्यात गोवण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध बनावट पुरावे तयार करण्याचे षड्यंत्र रचले जात होते. या ऑडिओ सोबत असलेला पेनड्राईव्ह देखील पुराव्यासाठी प्रशासनाला देण्यात आला आहे. या ऑडिओ संभाषणातून आणखी एक अत्यंत संतापजनक बाब समोर आली आहे. विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवण्याची आणि त्यामाध्यमातून तीव्र आंदोलन उभे करण्याची योजना वाल्मीक कराड, सुग्रीव कराड आणि रमेश घुले यांनीच आखली होती. या आंदोलनाआडून संपूर्ण जल्ह्यिात अस्थिरता नर्मिाण करणे, दोन जातींमध्ये व समाजात जाणीवपूर्वक तेढ नर्मिाण करून आपापसात भांडणे लावणे तसेच संपूर्ण जल्हिा व पोलीस प्रशासनास वेठीस धरणे, हा यामागचा मूळ हेतू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शांतताप्रिय बीड जल्ह्यिामध्ये सामाजिक सलोखा बिघडवून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा हा अत्यंत सुनियोजित डाव होता, हे यामुळे स्पष्ट होते, असे म्हटले आहे. बीडच्या शांततेला सुरुंग लावणाऱ्या आणि नष्पिाप व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या या रॅकेटमागील सर्व बडे चेहरे उजेडात आणून कठोर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जल्ह्यिाचे लक्ष लागून आहे.
मोबाईल वापरामुळे प्रशासनावर प्रश्नचन्हि
अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बीड जल्हिा कारागृहामध्ये बंदी असतानाही आरोपींना एक पेक्षा अधिक मोबाईल फोन व संभाषणाची साधने कशी उपलब्ध होतात, हा संशोधनाचा विषय बनला आहे. कारागृह प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या थेट संगनमताशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे या गुन्हेगारी षड्यंत्रामध्ये कारागृह प्रशासनातील काही घटकही प्रत्यक्ष सहभागी असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रकरणाचे वाढते गांभीर्य लक्षात घेता, खा.बजरंग सोनवणे यांनी तातडीने कठोर कायदेशीर पावले उचलण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वाल्मीक बाबुराव कराड (परळी), सुग्रीव माणिक कराड (केज), रमेश घुले (टाकळी, ता.केज), अधीक्षक, जल्हिा कारागृह, बीड, संबंधित दोषी कारागृह प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.