केज:- केज तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

दि. १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते रमेशरावजी आडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आहे. निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात या वर्षी पाऊसाचे प्रमाण अत्यंत अल्प राहिले असुन पाऊसातील दीर्घ खंडामुळे खरीपातील सर्व पिके करपून गेली आहेत, कृषि विज खंडीत केल्यामुळे शेतकऱ्या समोरिल संकट बिकट झालेले आहेत. नदी, विहीर, व तलाव यामध्ये पाणी साठा शिल्लक नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी वणवन भटकावे लागत आहे. पशुधनासाठी चारा व पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामिण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यां करीता उपयोजना तात्काळ कराव्यात. यासह शेतकऱ्यांना जाचक आटी न लावता पंचनामे करुण सरसकट अर्थिक मदत व भरीव अनुदान जाहीर करण्यात यावे. जनावरांसाठी चारा छावणी सुरु करण्यात याव्यात. मजुरांची उपजिवीका भागवीण्यासाठी म.न.रे.गा. ची कामे तात्काळ चालु करण्यात यावे. शैक्षणिक वर्ष २०२६- २७ या वर्षातील विद्यार्थीचे स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. आर्थिक वर्ष २०२६-२७ आणि मागील खरीप हंगामातील पिक विमा मंजुर करण्यात यावा. पाण्याची टंचाई असेल अशा गावांना टँकर उपलब्ध करुण देण्यात यावा. महावितरणाने शेतकऱ्यांचे शेतीचे व घरगुती विज बिल भरण्याचा तगादा लावण्यात येऊ नये. या मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे. निवेदनावर ज्येष्ठ  नेते रमेशराव आडसकर यांच्यासह अमर पाटील, अरुण बप्पा धपाटे, मनोज कदम यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.