अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथे शेताच्या सामायिक बांधावरून सुरू असलेल्या वादातून चार जणांनी एका कुटुंबातील वृद्ध महिला आणि तरुणावर विळा व काठीने जीवघेणा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत.

ऋषिकेश दत्ता मुळे हे आपल्या आजी आणि चुलत भावासह शेतात काम करत असताना शेजारील सुनील मुळे, अमोल मुळे, दिनेश मुळे आणि पिंटू मुळे यांनी येऊन 'आमच्या बांधावरून चालायचे नाही' असा दम भरला. हा सामायिक बांध असल्याचे सांगताच आरोपींनी ऋषिकेश आणि त्यांच्या आजीला काठीने झोडपून काढले. अमोल मुळे याने विळ्याने ऋषिकेश यांच्या डाव्या दंडावर वार करून त्यांना जखमी केले. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.