अंबाजोगाई: वाघाळा ते अंबाजोगाई रस्त्यावरील आदिती हॉटेलजवळ एका चारचाकी वाहनाने निष्काळजीपणे वाहन चालवून पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याच्या छातीला मार लागून पाय फ्रॅक्चर झाला आहे.

अरविंद अशोक मोरे (वय ३८, रा. मोरेवाडी, अंबाजोगाई) हे रस्त्यावरून जात असताना चारचाकी वाहन (क्रमांक MH-44 AE-5558) वरील चालकाने गाडी भरधाव वेगाने चालवून त्यांना जोरात उडवले. या अपघातात अरविंद मोरे यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून छातीलाही मोठी दुखापत झाली. जखमीचे बंधू अमोल अशोक मोरे यांच्या फिर्यादीवरून कारचालक यशवंत प्रवीण मोरे याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.