बीड तालुक्यातील मोरगाव येथे 'तू गावात राहायला कशाला आलास' या कारणावरून एका ५४ वर्षीय शेतकऱ्याला लोखंडी गज आणि काठीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. १ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश विलास कागदे (वय ५४) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्रीच्या वेळी रमेश हे आपल्या घरासमोर उभे असताना त्यांच्याच गावातील बाबू सोपान कागदे, हरिदास सोपान कागदे, सोपान बापूराव कागदे आणि बाबू दत्तू कागदे यांनी संगनमत करून त्यांना गाठले. गावात राहण्याच्या कारणावरून वाद घालत बाबू आणि हरिदास यांनी रमेश यांना लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचे मनगट, पाठ आणि पायावर गंभीर जखमा झाल्या. यावेळी इतर दोघा आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रमेश कागदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिसांनी चारही आरोपींवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला असून, या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार राठोड हे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!