अंबाजोगाई: येथील वसुंधरा महिला नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुनंदाताई मुंदडा यांची मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि. छत्रपती संभाजीनगरच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड जाहीर करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी किरण एम. चौधरी यांनी अधिकृत घोषणा केली. या निवडीमुळे सहकार क्षेत्रात अंबाजोगाईसह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


सहकार आणि राजकीय स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि सहकार क्षेत्रातील योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनंदाताई मुंदडा यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार नमिताताई मुंदडा, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी), पंगेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा अक्षय मुंदडा, तसेच मार्केट कमिटीचे राजूशेठ भन्साळी, ॲड. आर. डी. कदम, बळीराम चोपणे, वसुंधरा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश शर्मा यांनी प्रत्यक्ष भेटून व संपर्क साधून अभिनंदन केले.

यासोबतच माजी नगराध्यक्ष महादूभाऊ मस्के, संतोष आबा लोमटे, वैद्यनाथ देशमुख, डॉ. पाचेगावकर, उमाकांत दीक्षित, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ॲड. मकरंद पत्की, सीए वालवडकर, सहकार भारती सहकारी प्रशिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक कुलकर्णी सर यांच्यासह राजकीय, सामाजिक, बँकिंग व सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मोलाची मदत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.