बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथे विनोद वसंत कानडे (रा. घोसापुरी) या मजुरी करणाऱ्या तरुणाला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना २९ ऑक्टोबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी मनोहर कानडे, वैभव कानडे, मोहन कानडे आणि सुवर्णा कानडे (सर्व रा. घोसापुरी) यांनी संगनमत करून विनोद व त्याच्यासोबतच्या साक्षीदाराला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, मुख्य आरोपी मनोहर याने विनोदच्या पोटावर आणि बरगडीवर काठीने मारून दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून ३० ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहितेनुसार बीड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार करांडे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!