पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ३० ऑक्टोबरला घडली. महाविद्यालयात परीक्षेदरम्यान चुकून पायाचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा भयंकर प्रकार घडला.
शंतनु घुमरे (वय १८, रा. मैदा) हा विद्यार्थी पेपर सुटल्यानंतर बसस्थानकाजवळील हॉटेलवर पाणी पीत होता. त्याचवेळी आरोपी महारुद्र देवकते (रा. ढेकणमोह) तेथे आला. त्याने शंतनुच्या तोंडावर बुक्की मारली आणि कमरेचा बेल्ट काढून पाठीवर सपासप वार केले. शंतनुला खाली पाडून त्याच्या डोक्यात मागून वीट मारून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली. या भयंकर प्रकाराबाबत पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गर्जे करत आहेत.
पायाचा धक्का लागल्याने विद्यार्थ्याचे डोके फोडले
परीक्षेदरम्यान चुकून पायाचा धक्का लागल्याच्या रागातून महारुद्र देवकते याने शंतनु घुमरे (वय १८) या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. शंतनु पाणी पीत असताना महारुद्रने त्याला बेल्टने मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात वीट घालून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!