गेवराई तालुक्यातील लोणळा फाटा येथून एका ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला २८ ऑक्टोबरला दवाखान्यात गेली असता, ओळखीच्या दत्ता रुपनर याने तिला गावी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. कवडगाव येथील उसाच्या शेतात नेऊन त्याने अत्याचार केला व सोन्याचे दागिने हिसकावून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २९ ऑक्टोबरला पीडिता पोलिसांत तक्रार देण्यास जात असताना, दत्ता आणि त्याचा भाऊ अनु रुपनर यांनी तिला रस्त्यात अडवून मारहाण केली व तेथून पळ काढला. या गंभीर प्रकरणाचा तपास पिंक पथकाच्या सपोनि कदम करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!