केज  - बैलगाडीतून चाललेल्या एका १९ वर्षीय युवतीस खाली ओढून विनयभंग केला. तिला उसाच्या वाड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी तीन तरुणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

       केज तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय युवती शिक्षण घेत असून २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ती नातेवाईकांसह बैलगाडीतून शेतात चालली होती. नांदूरघाट येथील मसोबाच्या मंदिराजवळ त्यांची बैलगाडी आली असता स्वप्निल छञभुज आंधळे, गोट्या छञभुज आंधळे, गोपाळ बाजीराव आंधळे (सर्व रा. खाडेवाडी ता. केज) या तिघांनी त्यांची बैलगाडी आडविली. या युवतीस बैलगाडीच्या खाली ओढून तिच्या हाताला वाईट उद्देशाने धरून विनयभंग केला. तिला उसाच्या वाड्याने मारहाण करीत जखमी केले. नातेवाईकांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ही शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार पीडित युवतीने दिल्यावरून आरोपी स्वप्निल आंधळे, गोट्या आंधळे, गोपाळ आंधळे या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या मार्गदर्शनात जमादार राजू वंजारे हे पुढील तपास करीत आहेत.