बर्दापूर: अंबाजोगाई ते घाटनांदूर रोडवरील पुस येथील शिवाजी चौकाजवळ भरधाव ॲपे रिक्षाने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत एका पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता हा अपघात घडला.

संदीप कोंडबा नवघरे (वय २५, रा. उटी, जि. यवतमाळ) हा दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात ॲपे रिक्षा चालकाने निष्काळजीपणे रिक्षा चालवून समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात संदीप जागीच मरण पावला, तर त्याच्यासोबत असलेला प्रदीप किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी संदीपचे वडील कोंडबा नवघरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.