पेठ बीड: माऊली नगर परिसरात एका व्यक्तीला त्याच्या घरासमोर जमावाने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहाजी नागु उपळकर (वय ४३) हे त्यांच्या घरी असताना अकरा ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता पाच जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.
शैलेश कृष्णा देवकर, विशाल मनोहर देवकर, रोहण राजेश सूर्यवंशी, महाविर अर्जुन विटकर आणि मयुर महादेव जाधव (सर्व रा. माऊली नगर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शहाजी यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. याप्रकरणी शहाजी उपळकर यांच्या वैद्यकीय अहवालावरून पंधरा ऑक्टोबरला पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार आघाव अधिक तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!