बीड शहरातील पेठ बीड भागात खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करून सोन्याची साखळी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास महेश आटा मिलच्या पाठीमागील रस्त्यावर हा प्रकार घडला. या हल्ल्यात व्यापारी ओमप्रकाश धनराज चितला हे गंभीर जखमी झाले आहेत.
आरोपी रोहित सुरेंद्र गायकवाड याने चितला यांच्याकडे खर्चासाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या रोहितने शिवीगाळ करत हातातील कोयत्याने थेट चितला यांच्या कपाळावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत पळ काढला. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक बारगळ तपास करत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!