गेवराई तालुक्यातील चकलांबा गावातून अवेश पाशु शेख हा ३८ वर्षीय तरुण घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अवेश घरात कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. नातेवाइकांनी सर्व संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही त्याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही.

आपल्या मुलाला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेल्याचा संशय वडील पाशु महंमद शेख यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रधान या प्रकरणाचा अधिक तपास करत असून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.