ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत मिळणाऱ्या 'फार्मर आयडी'चा वापर करून स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करणे आणि वितरित करणे पूर्णपणे अनधिकृत असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. काही जिल्ह्यांमध्ये असा गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारींनंतर, कृषी विभागाने राज्यातील सर्व 'सीएससी' (CSC) चालकांना ही बेकायदेशीर कार्यवाही तात्काळ थांबवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही अनधिकृत सेवांचा लाभ घेऊ नये आणि या बनावट ओळखपत्रांना शासकीय मान्यता असल्याचे समजू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शासनाच्या या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!