केज: ट्रॅक्टर सोयाबीनच्या ढिगाऱ्यावरून गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शेतकऱ्याला आणि त्याच्या साक्षीदाराला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार कासीदवाडी येथे घडला आहे. पंधरा ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ वाजता अशोक बबन जाधवर हे ट्रॅक्टर घेऊन शेजाऱ्यांच्या घरासमोरून जात होते.
त्यावेळी ट्रॅक्टरचे चाक सोयाबीनवरून गेल्याच्या रागातून शशीकांत जाधवर, अशोक जाधवर, महादेव जाधवर, श्रीकांत जाधवर आणि सुधीर जाधवर यांनी एकत्रित येत शिवीगाळ सुरू केली. आरोपी सुधीर याने अशोक यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात सर्व पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!