अंबाजोगाई: आकोला गावातील शेतातून चंदनाची मौल्यवान झाडे तोडून चोरून नेणाऱ्या लातूर जिल्ह्यातील एका टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पंधरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आकोला येथील शेतात ही धडक कारवाई करण्यात आली. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार बाबुराव मुंडे यांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला.
त्यावेळी राम अंकुश गायकवाड (रा. तांदुळजा, जि. लातूर) हा चंदनाचे झाड तोडताना सापडला. चौकशीत त्याने हे चंदनाचा गाभा मुरुड येथील राजू गायकवाड याला विकत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी वन कायद्याअंतर्गत याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!