अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी ईश्वर शिंदे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी १६ ऑक्टोबर रोजी पोलिसांत ही तक्रार दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ईश्वर शिंदेनी(रा. भारज, ता. अंबाजोगाई) शिवसेना बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांना फोन करून 'तुम्ही जरांगे पाटील यांच्या विरोधात का बोललात?' असा जाब विचारला. यावर गलधर यांनी आपण जिल्हाप्रमुख असल्याने पक्षाची भूमिका मांडावी लागते असे स्पष्ट केले. मात्र, यावेळी ईश्वर शिंदेनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. हा सर्व दूरध्वनी संवाद कुणीतरी सोशल मीडियावर प्रसारित केल्याने हा प्रकार उघडकीस आला. या आक्षेपार्ह भाषेमुळे भावना दुखावल्याने वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!