अंबाजोगाई: शहरातील रायगडनगर भागात पाणी वितरणाची पाईपलाईन फोडून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई नगरपरिषदेचे पाणी पुरवठा निरीक्षक दत्तात्रय यादवराव सावंत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ११.३० च्या दरम्यान सावंत हे कर्तव्यावर असताना रायगडनगर भागात पाणी सोडणारे दिगंबर सुभाष यादव यांनी त्यांना पाईपलाईन फोडल्याची माहिती दिली. सावंत यांनी राम टिंगरे यांच्या घरासमोर जाऊन पाहणी केली व आजूबाजूला चौकशी केली असता राम टिंगरे, गणेश पोपडे, बालाजी नरसिंगे आणि संतोष पवार यांनी ४ एच.डी.पी.ई. पाण्याची पाईपलाईन कापून तिचे नुकसान केले असल्याची माहिती त्यांना मिळाली.
या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीप्रकरणी दत्तात्रय सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्व आरोपींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुट्टे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!