अंबाजोगाई शहरातील फार्मट्रॅक ट्रॅक्टर शोरूमसमोर एका भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तीस सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता. जखमी हनुमंत अप्पाराव मुळे यांच्या उजव्या मांडीचे हाड आणि जॉइंट फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपी सुमित विलास केंद्रे याने आपल्या ताब्यातील मोटारसायकल अतिशय हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या हनुमंत मुळे यांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर जखमी वृद्धाचे सुपुत्र सुधीर हनुमंत मुळे यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार गुडे तपास करत आहेत.