Breaking
Updated: ऑगस्ट 11, 2025
आगारनांदूर मध्ये घरफोडी; दागिन्यांसह मोटारसायकलची चोरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : आगारनांदूर (ता. गेवराई) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ४ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून ५ ऑगस्टच्या पहाटे १.३० वाजेपर्यंत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी बाबासाहेब प्रभाकर कोकरे यांच्या घरी चोरट्यांनी चराच्या गेट व दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकर फोडून सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर बद्री शिवाजी काळे यांच्या घरासमोरील एमएच २० एसी १४२८ क्रमांकाची मोटारसायकलही चोरट्यांनी पळवून नेली. या चोरी त सोन्याचे डोरले (१.१०० ग्रॅम, किंमत ₹५,१००), सोन्याचे मणी व पीवर जोडवे (₹३,२६०), सोन्याचे मंगळसुत्र (७ ग्रॅम, ₹२८,०००), दोन अंगठ्या (एकूण ४ ग्रॅम, ₹१६,०००), नाकातली नथ (₹४,०००) आणि सोन्याचे ‘ओम’ (₹४,०००). एकूण किंमत ₹६०,३६० एवढा एकूण ऐवज चोरीस गेला आहे.
या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक उदगीरकर करत आहेत.