Breaking
Updated: एप्रिल 30, 2026
कॉलेजच्या ग्रंथालयातून ६० हजारांचा महागडा कॅमेरा चोरीला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: गेवराई तालुक्यातील गढी येथे शिव्या देण्यावरून झालेल्या वादात एका साठ वर्षीय महिलेला विटाने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ज्येष्ठ महिलेला भररस्त्यात मारहाण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कमल एकनाथ लव्हाळे (वय ६०, रा. जयभवानी नगर, गढी) यांनी याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
२५ एप्रिलच्या संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरासमोर उभी असताना हा प्रकार घडला. आरोपी प्रशांत दादाराव सोळसकर (रा. गढी) याला फिर्यादीने ‘मला नेहमीच शिव्या का देतोस’ असे विचारले. याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीच्या आई-बहिणीवरून अर्वाच्य शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील विटाने महिलेच्या डोक्यात कानाच्या डाव्या बाजूला जोरात प्रहार करून तिला जखमी केले.
गेवराई पोलिसांनी आरोपी प्रशांत सोळसकर विरुद्ध कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत ज्येष्ठ महिलेवर झालेल्या या हल्ल्यामुळे आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.