Breaking

जुन्या वादातून दोन कुटुंबांत राडा; लोखंडी विळ्याने महिलेला मारहाण

Updated: एप्रिल 30, 2026

By Vivek Sindhu

जुन्या वादातून दोन कुटुंबांत राडा; लोखंडी विळ्याने महिलेला मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळवघाट येथे जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले असून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली आहे. या घटनेत एका साठ वर्षीय महिलेला लोखंडी विळ्याने मारून जखमी करण्यात आले.

आशाबाई उत्तरेश्वर कदम (वय ६०, रा. येळवघाट) यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. २३ मार्चच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या शेतात ही घटना घडली. आरोपी महादेव आश्रूबा कदम आणि प्रतीक महादेव कदम यांनी संगनमत करून फिर्यादीच्या दिराला शिवीगाळ आणि मारहाण केली. आशाबाई आणि त्यांची जाऊ भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, आरोपीने हातातील लोखंडी विळ्याने आशाबाईंच्या डाव्या हातावर प्रहार केला, ज्यामुळे त्या जखमी झाल्या.

नेकनूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार बळवंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जुने वाद मिटण्याऐवजी वाढत गेल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे.


Categories

Recent Posts