Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

गेवराईत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह; आई-वडिलांसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 24, 2026

By Vivek Sindhu

आई-वडिलांसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील साईसिद्धी हॉल येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह प्रौढ पुरुषाशी लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून मुलीच्या आई-वडिलांसह पती आणि सासरच्या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळादेवी येथील रहिवासी असलेल्या १४ वर्षीय अनुष्का (नाव बदलले आहे) हिचा विवाह २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता सिद्धार्थ मधुकर आवारे याच्याशी गेवराईतील साईसिद्धी हॉलमध्ये पार पडला होता. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला या बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी रत्नमाला बाबूराव बारकुल यांनी पथकासह गेवराई गाठले. पीडित मुलीच्या शाळेचा निर्गम उतारा तपासला असता, तिचा जन्म २९ डिसेंबर २०११ रोजी झालेला असून लग्नाच्या वेळी ती केवळ १४ वर्षांची असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, आई, पती सिद्धार्थ मधुकर आवारे, सासरा मधुकर बापुराव आवारे आणि सासू शारदा मधुकर आवारे (सर्व रा. पिंपळादेवी, जि. बीड) यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या सर्वांनी मिळून अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला आणि बालविवाहास प्रोत्साहन दिले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रेश्मा लिंबाजी पौले करत आहेत.


Categories

Recent Posts