Breaking

अँगल उचलण्यावरून वाद; मुलाच्या हाताला लोखंडी अँगलने मारून केले जखमी

Updated: एप्रिल 30, 2026

By Vivek Sindhu

मुलाच्या हाताला लोखंडी अँगलने मारून केले जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंंबाजोगाई शहरात दारातील लोखंडी अँगल उचलण्यावरून शेजाऱ्यांमध्ये जुंपली असून या वादात एका महिलेने तरुणाला अँगलने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. रमाई चौक परिसरात झालेल्या या राड्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मुक्ताबाई साहेबराव कावळे (वय ४६, रा. रमाई चौक) यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२८ एप्रिलच्या सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी शिला नानासाहेब घेटे ही फिर्यादीच्या दारातील लोखंडी अँगल उचलत होती. तिला जाब विचारला असता तिने शिवीगाळ सुरू केली. मुक्ताबाईंचा मुलगा मोहित भांडण सोडवण्यासाठी आला असता, आरोपीने त्याच्या हाताला लोखंडी अँगलने मारून गंभीर दुखापत केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यावर अँगलने प्रहार केल्याने त्यांच्या भुवईला मार लागला.

अंबाजोगाई पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शिला घेटे, प्रेम घेटे, संजय निसर्गंध आणि केशरबाई निसर्गंध यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीने शेजारील संबंध ताणले गेले आहेत.


Categories

Recent Posts