Breaking

कॉलेजच्या ग्रंथालयातून ६० हजारांचा महागडा कॅमेरा चोरीला

Updated: एप्रिल 30, 2026

By Vivek Sindhu

कॉलेजच्या ग्रंथालयातून ६० हजारांचा महागडा कॅमेरा चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: आष्टी येथील हंबर्डे कॉलेजच्या ग्रंथालयाची खिडकी तोडून चोरट्याने मौल्यवान कॅमेरा आणि साहित्यावर हात साफ केला आहे. शैक्षणिक संस्थेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे खळबळ उडाली आहे. सुनील आश्रूबा मुरकुटे (वय ४८, रा. गणेशनगर, मुर्शदपूर) यांनी या चोरीप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चोरट्याने २४ एप्रिलच्या मध्यरात्री खिडकीतून ग्रंथालयात प्रवेश केला. चोरून नेलेल्या साहित्यात ५६,००० रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा (मॉडेल १७५०), २,००० रुपयांचे एक्स्टेंशन केबल बंडल आणि २,००० रुपयांची चार्जिंग वायर व बॅटरी असा एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल आहे. सकाळी ग्रंथालयाचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.


Categories

Recent Posts