Breaking
Updated: एप्रिल 30, 2026
सांडसचिचोलीत तरुणाला बेल्टने झोडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव तालुक्यातील सांडसचिचोली येथे विनाकारण कुरापत काढून एका तरुणाला बेल्ट आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी ‘आम्हाला तुझ्यासोबत भांडण करायचे आहे’ असे म्हणत हा हल्ला चढवला. करण कृष्णा पोल (वय १७, रा. सांडसचिचोली) या तरुणाने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
२९ एप्रिलच्या संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास नदीजवळ हा प्रकार घडला. आरोपी विनोद मोहन गायकवाड, विशाल मोहन गायकवाड, वक्या विलास गायकवाड आणि भारत गायकवाड (सर्व रा. सांडसचिचोली) यांनी संगनमत करून फिर्यादीला घेरले. आरोपींनी विनाकारण शिवीगाळ करत बेल्टने करणला बेदम मारहाण केली. तसेच एका आरोपीने लोखंडी रॉडने करणच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले.
माजलगाव ग्रामीण पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक फौजदार बलवंते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गावात अशाप्रकारे विनाकारण कुरापत काढून तरुणांना मारहाण केल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे.