Breaking

दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात काठीने केला प्रहार

Updated: एप्रिल 30, 2026

By Vivek Sindhu

कॉलेजच्या ग्रंथालयातून ६० हजारांचा महागडा कॅमेरा चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: केज तालुक्यातील बनसारोळा येथे एका मुलाने दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या वडिलांना काठीने मारून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पित्याला मारहाण करणाऱ्या या कलयुगी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू अगन्नाथ गोरे (वय ५२, रा. बनसारोळा) यांनी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात आपल्या मुलाच्या विरोधात तक्रार दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने वडील व मुलगा आहेत. २८ एप्रिलच्या संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपी मुलगा चंद्रकांत बाळू गोरे याने दारू पिऊन घरात राडा केला. त्याने रागाच्या भरात हातात काठी घेऊन वडिलांच्या डोक्यात जोराने प्रहार केला, ज्यामुळे वडील गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर मुलाने वडिलांना शिवीगाळही केली.

युसूफवडगाव पोलिसांनी आरोपी चंद्रकांत गोरे विरुद्ध कलम ११८(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. व्यसनामुळे रक्ताची नाती कशी धुळीला मिळतात, याचे हे भयानक उदाहरण बनसारोळा गावात चर्चेचा विषय ठरले आहे.


Categories

Recent Posts