Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

जैताळवाडी शिवारात ११ केव्ही लाईनची ३५ हजारांची तार चोरीला

Updated: जानेवारी 17, 2026

By Vivek Sindhu

प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई : चकलांबा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जैताळवाडी शिवारात अज्ञात चोरट्याने विजेच्या चार खांबांवरील ३५ हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियमची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेकनूर येथील रहिवासी अनिस अजिमुद्दीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान जैताळवाडी शिवारातील ११ केव्ही लाईनच्या चार पोलवरील १५९ किलो वजनाची ॲल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्याने तोडून नेली. प्रति किलो २२० रुपये प्रमाणे या तारेची किंमत ३५ हजार रुपये आहे. शेतात वीज नसल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार पचार या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts