Breaking
Updated: मे 27, 2026
पिकअपमधून म्हैस चोरणारी टोळी जेरबंद; दोघांना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी तालुक्यातील पोहनेर येथे शेतात बांधलेली ६५ हजार रुपये किमतीची मुऱ्हा जातीची म्हैस आणि तिचा पाडा (हाल्या) पिकअप गाडीत भरून चोरून नेणाऱ्या टोळीचा शिरसाळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही घटना २५ मे रोजी रात्री सात ते दीड वाजेच्या सुमारास पोहनेर येथील पुढची नदीच्या पुलावर घडली. या प्रकरणी शेतकरी रमेश नारायण काकडे यांच्या तक्रारीवरून शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अनिल शिवाजी काळे आणि राणी अनिल काळे (दोघे रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांना अटक केली आहे, तर त्यांचा एक अज्ञात साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
फिर्यादी रमेश काकडे यांनी नेहमीप्रमाणे आपली मुऱ्हा जातीची ६० हजार रुपये किमतीची म्हैस आणि ५ हजार रुपयांचा दहा महिन्यांचा हाल्या शेतात बांधला होता. आरोपींनी संगनमत करून अशोक लेलँड कंपनीच्या पिकअप गाडीतून (क्र. MH-04 GC-2399) हा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांना ताब्यात घेतले असून पळून गेलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस हवालदार शेंगुळे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात सुटकेचा श्वास घेतला जात आहे.