Breaking

सेंट्रिंग कामाचे पैसे मागितल्याने मजुराला लोखंडी गजाने बेदम मारहा

Updated: मे 27, 2026

By Vivek Sindhu

सेंट्रिंग कामाचे पैसे मागितल्याने मजुराला लोखंडी गजाने बेदम मारहा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केरुळ येथे सेंट्रिंग कामाची मजुरी मागण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय मजुराला लोखंडी गजाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोमनाथ राम सावंत असे जखमी मजुराचे नाव असून, २६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ हे आरोपींकडे आपल्या हक्काचे पैसे मागण्यासाठी गेले होते. याचा राग आल्याने कृष्णा कुंडलीक अनारसे, महेश बबण अनारसे, दत्ता कुंडलीक अनारसे आणि कुंडलीक अनारसे या चौघांनी संगणमत करून पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मजुराला अमानुषपणे मारहाण करत गंभीर जखमी केले, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मजुराच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार नवले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts