Breaking
Updated: मे 27, 2026
गुटख्यासह साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- धाराशिव जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात गुटखा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने कारवाई करून गोटेगाव (ता. केज) येथे सापळा लावून जीप पकडली. पोलिसांनी गुटख्यासह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघां विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना एका गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली मी, एक जीप कळंब (जि. धाराशिव) येथून गुटखा व पान मसाला घेऊन गोटेगाव मार्गे केजकडे येत आहे. माहिती मिळताच त्यांनी त्यांचे पथकाला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, फौजदार अमिरोद्दीन इनामदार, हेडकॉन्स्टेबल धोंडीराम मोरे, हेडकॉन्स्टेल राजू वंजारे यांच्या पथकाने २३ मे रोजी दुपारी ४.१५ वाजता सापळा लावून गोटेगाव शिवारात गुटखा घेऊन आलेली विना क्रमांकाची जीप पकडली. जीप चालक संजय रामलिंग तपसे (रा. चंदनसावरगाव ता. केज) यांच्या ताब्यातील पान मसाला व गोवा, तंबाखू, दिलबाग पान मसाला, तंबाखू पत्ती आणि जीप असा ६ लाख ५३ हजार ९४५ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल धोंडीराम मोरे यांच्या फिर्यादी वरून संजय तपसे आणि रंजीत आगाडे या दोघां विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १४२/२०२६ भा. न्या. सं. १२३, २७४, २७५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल सीताराम डोंगरे हे तपास करीत आहेत.