Breaking
Updated: मे 27, 2026
बकरी-ईद निमित्त केज पोलिसांनी घेतली केज आणि नांदुरघाट येथे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांची बैठक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- बकरी-ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन केज येथे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केज आणि नांदुरघाट येथे गटनेते हारून इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठित नागरिक, मौलवी व मुस्लिम समाजातील प्रमुखांची बैठक घेतली.
दि. २६ मे आणि २७ मे रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केज येथील मौलवी व प्रतिष्ठित मुस्लिम बांधवांची बैठक घेतली. या बैठकीला केज नगर पंचायतचे गटनेते तथा जनविकासचे प्रमुख हारून, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र बकरी ईदच्या निमित्ताने शासनाने घालून दिलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याचे नियम व अटींचे पालन करून साध्या पद्धतीने आपापल्या सण साजरा करण्याचे आव्हान केले.
यावेळी पोलिस हवालदार शिवाजी कागदे, पोलिस हवालदार संतोष गित्ते, पोलिस जमादार राजू वंजारे, मेहेत्रे, शेख पाशा यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.