Breaking

बीडमध्ये जुन्या राजकीय वादातून तरुणावर कुकरीने जीवघेणा हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: मे 26, 2026

By Vivek Sindhu

*बीडमध्ये जुन्या राजकीय वादातून तरुणावर कुकरीने जीवघेणा हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड नगरपरिषद निवडणुकीच्या जुन्या राजकीय वैमनस्यातून आणि गाडी लावण्याच्या कारणावरून एका ३४ वर्षीय व्यापाऱ्यावर कुकरीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पेठ बीड भागात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झमझम कॉलनीतील रहिवासी रफिक लायक इनामदार हे २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुटुंबासह मोमीनपुरा येथील नसीब कटपीस दुकानात कपडे खरेदीसाठी गेले होते. त्या वेळी त्यांचे मावसभाऊ बीड नगरपरिषद निवडणुकीत उभे राहिले असताना रफिक यांनी केलेल्या प्रचाराचा राग मनात धरून आरोपींनी वाद उकरून काढला. रफिक यांचे भाऊ इखरार यांनी रस्त्यावर गाडी लावली या कारणावरून खलील मोहम्मद साहब याने शिवीगाळ सुरू केली. रफिक यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता खलील, रफिक मोहम्मद साहब, रौफ डिके, हाजी कामील आणि फाजील आंबेवाले यांनी त्यांना घेरले.

या वेळी खलील याने रफिक यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मानेवर कुकरीने वार केला. रफिक थोडे बाजूला सरकल्याने हा वार त्यांच्या पाठीवर आणि डाव्या हातावर बसला, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रफिक सोनवणे यांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ३५२ आणि १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मारुती भीमसेन खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियंककुमार पुजारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts