Breaking

पाटोदा येथे शेतातील रस्त्याच्या वादातून वृद्धाला मारहाण

Updated: मे 27, 2026

By Vivek Sindhu

पाटोदा येथे शेतातील रस्त्याच्या वादातून वृद्धाला मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथे शेतातील रस्त्यावरून झालेल्या वादात एका ७८ वर्षीय वृद्धाला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. २६ मे २०२६ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी उत्तम रावसाहेब घोळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमोल तुकाराम घोळवे आणि कृष्णा तुकाराम घोळवे या दोघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या शेतात रस्त्याचे काम सुरू असताना त्यांनी आरोपींना आधी माती बाजूला करून नंतर खडी टाकण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून एकाच भावकीतील असलेल्या आरोपींनी वृद्धाला जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts