Breaking
Updated: मे 27, 2026
दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – भरधाव पिकअपने समोरून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना केज – विडा रस्त्यावरील चौफळा येथे घडली होती. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पिसेगाव (ता. केज) येथील गणेश बालासाहेब नेहरकर (वय ३५) हे ८ मे रोजी रात्री ७ वाजता दुचाकीवरून कोल्हेवाडी येथे सासू – सासऱ्याकडे कामानिमित्त गेले होते. परत दुचाकीवरून येत असताना केज – विडा रस्त्यावरील चौफळा येथे त्यांच्या दुचाकीला (एम. एच. २५ एक्स ००६४) समोरून भरधाव वेगात पिकअपने (एम. एच. २५ पी. २२७५) जोराची दिल्याने गणेश नेहरकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रथमोपचार करून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी ९ मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान गणेश नेहरकर यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी मनीषा नेहरकर यांनी २६ मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून पिकअप चालक भानुदास ठानु पवार (रा. लमाण तंडा, येवता ता. केज) याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार गोरख फड हे तपास करताहेत.