बीड : ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी 'एक गाव एक ग्रंथालय' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २० गावांमध्ये ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून वाचनालये उभारण्यात येणार आहेत.
प्रत्येक वाचनालयात मराठी साहित्य, चरित्रे, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, बालसाहित्य आणि दैनिक वृत्तपत्रे उपलब्ध असतील. गावातील शिक्षक, निवृत्त कर्मचारी आणि युवकांच्या समितीकडे वाचनालयाचे व्यवस्थापन सोपवले जाणार आहे.
पुस्तकदान मोहिमेद्वारे नागरिकांकडून पुस्तके संकलित करण्यात येत आहेत. वाचनालयांमध्ये दर महिन्याला वाचक मेळावे, कथाकथन आणि निबंध स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे.




प्रतिक्रिया (२)
आमच्या तालुक्यातील बातम्याही अशाच द्या.
आमच्या तालुक्यातील बातम्याही अशाच द्या.