अंबाजोगाई : गणेशोत्सव जवळ येत असल्याने शहर व परिसरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. यावर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना ग्राहकांकडून वाढती मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सवाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. यावर्षी अनेक मंडळांनी डीजे व मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमऐवजी पारंपरिक ढोल-ताशा पथकांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी आणि वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.
प्रशासनाच्या सूचना
मंडळांनी मंडप उभारणीसाठी नगर परिषदेची परवानगी घ्यावी, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा आणि ध्वनिमर्यादेचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. उत्सव काळात वाहतूक व सुरक्षेचे नियोजन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.





प्रतिक्रिया (२)
खूप उपयुक्त माहिती. अशाच स्थानिक बातम्या नियमित मिळाव्यात.
शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. धन्यवाद विवेक सिंधू!