अंबाजोगाई : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी शहरातील सार्वजनिक वाचनालयात मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही अभ्यासिका खुली राहणार असून, एकाच वेळी १२० विद्यार्थी अभ्यास करू शकतील.
अभ्यासिकेत एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे आणि पोलीस भरती परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके, दैनिक वृत्तपत्रे, मासिके आणि मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. मुलींसाठी स्वतंत्र विभाग आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
मार्गदर्शन शिबिरे
दर महिन्याला यशस्वी उमेदवार व तज्ज्ञांची मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी आधार कार्ड व शैक्षणिक प्रमाणपत्रासह वाचनालय कार्यालयात संपर्क साधावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे.




प्रतिक्रिया (१)
ही योजना खरोखर राबवली गेली तर चांगले होईल.