राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसीट महामंडळाकडून प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सलवत देण्यात येते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने महिलांसाठी एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता महिला तसेच ज्या वृद्ध व्यक्तींचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना एसटी भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येते. तर दुसरीकडे ज्या व्यक्तींचं वय हे 75 पेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना एसटीचा प्रवास हा मोफत आहे.
दरम्यान त्यानंतर आता सरकारने एसटीचा हा लाभ मिळवण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात आली आहे. या कार्डसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. एक सप्टेंबरनंतर ज्या महिलांकडे एनसीएमसी कार्ड नसेल त्यांना एसटीचं पूर्ण भाडं भरावं लागेल असं एसटी महामंडळाने म्हटलं होतं.
मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एसटी महामंडळाने NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
demo test
yes
good
working





प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!