केज : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी यासाठी डिजिटल वर्गखोल्यांचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २५ शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या डिजिटल वर्गखोल्यांमध्ये अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ, अॅनिमेशन आणि सराव चाचण्यांचा वापर करून शिकवले जाणार आहे. विशेषतः गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांतील संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजाव्यात हा यामागचा उद्देश आहे.
शिक्षकांना प्रशिक्षण
डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी संबंधित शाळांतील शिक्षकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोकसहभाग आणि सीएसआर निधीतून हा उपक्रम राबवला जात असून, पुढील शैक्षणिक वर्षात तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तो पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.




प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!