Breaking

आश्चर्य! मुख्य रस्त्यावरील सिसीटिव्ही खांबासह गायब

Updated: May 24, 2025

By Vivek Sindhu

आश्चर्य! मुख्य रस्त्यावरील सिसीटिव्ही खांबासह गायब

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

अंबाजोगाई – पाण्याची टाकी मोरेवाडी ते लोखंडी सावरगाव या मुख्य रस्त्यालगत असलेल्या जयभिमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसवलेला सिसीटिव्हीसह तिचा खांब गायब झाल्याचे दिसून येत आहे. खांबासह सिसीटिव्ही गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुख्य रस्त्यावर होत असलेले अपघात तसेच चोऱ्या रोकण्यासाठी शहरातील महत्याच्या ठिकाणी सिसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. पाण्याची टाकी मोरेवाडी ते लोखंडी सावरगाव या मुख्य रस्त्यावर असलेल्या जयभिमनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर सिसीटिव्ही व त्यासाठी लागणारा खांब तीन महिन्यापुर्वी बसवण्यात आला होता.

या सिसीटिव्हीमुळे रस्त्यावरील हालचाली व होणाऱ्या लक्षात येत होत्या. मागील दोन दिवसापुर्वी बसवलेले सिसीटिव्ही व तीचा खांब गायब झाल्याचे नागरीकांच्या लक्षात आले. दरम्यान हा सिसीटिव्ही कोणी चोरी केला की काढून नेला याचे गुढ कायम आहे. याठिकाणी सिसीटिव्ही बसवावा अशी मागणी होत आहे.

मागील तीन महिन्यापासून या रस्त्यावर सिसीटिव्ही कार्यरत होता. परंतू तीन दिवसापासून हा सिसीटिव्ही खांबासह
गायब झाल्याचे दिसून येत आहे.
– मधू शिनगारे
(रहीवाशी जयभिमनगर, मोरेवाडी )