Breaking

शेतजमिनीच्या पाण्याच्या वादातून गुळज येथे वृद्धाला दगड व काठीने मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

Updated: मे 20, 2026

By Vivek Sindhu

शेतजमिनीच्या पाण्याच्या वादातून गुळज येथे वृद्धाला दगड व काठीने मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

चकलांबा: शेतातील पाण्याचा कॉक बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला दगड आणि लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना गेवराई तालुक्यातील गुळज येथे घडली आहे. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बबन आवा शेंडगे (वय ५५, व्यवसाय- शेती, सध्या रा. १३ नंबर चारी, गुळज, मूळ रा. सावरगाव, ता. आष्टी) हे गुळज येथील शेत गट नंबर २३१ मध्ये असताना ही घटना घडली. आरोपींनी संगणमत करून फिर्यादीच्या शेतातील पाण्याचा कॉक बंद केला. यावरून वाद झाला असता आरोपी बाबू रामभाऊ खरात याने हातात दगड घेऊन बबन शेंडगे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

त्याच वेळी दुसरा आरोपी अंबादास रामभाऊ खरात याने लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यात आणि हाताच्या मनगटावर मारून गंभीर दुखापत केली. हा वाद पाहून फिर्यादीची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आली असता, आरोपींनी तिलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी बबन शेंडगे यांच्या तक्रारीवरून चकलांबा पोलिसांनी बाबू रामभाऊ खरात आणि अंबादास रामभाऊ खरात (दोन्ही रा. गुळज, ता. गेवराई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करत आहेत.


Categories

Recent Posts